Skip to main content

II आखाती बाप्पा २०१७ II

Aakhati Bappa 2017

निरोप देताक्षणी ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो म्हणजे सर्वांचा लाडका " गणपती बाप्पा " ज्याचे आगमन अगदी १ दिवसावर येऊन ठेपले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील तोच उत्साह तीच लगबग सर्वत्र दिसून येत आहे. नोकरी धंद्यानिमित्त परदेशात स्थलांतर होताना कित्येक लोकांनी परदेशात बाप्पाची स्थापना केली आणि बाप्पाचा उत्सव नकळतपणे जागतिक झाला. मात्र असे होताना भक्ती मध्ये मात्र तसूभरही फरक पडला नाही आणि ह्याला " आखाती देश " देखील अपवाद नाहीत. आखाती देशात तर तब्बल ३५-४० वर्ष बाप्पाची स्थापना होताना कित्येक घरांमध्ये दिसून येते.

हाच दुवा साधून " आखाती मराठी " संकेतस्थळातर्फे गेली ३ वर्ष अत्यंत यशस्वीपणे " घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे " आयोजन करण्यात आले. यंदा " आखाती मराठी" ५ व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि हाच योग साधून काही आगळे वेगळे करायचे हा हेतू मनात ठेवून आम्ही " आखाती बाप्पा २०१७ " हि संकल्पना सादर करत आहोत. सजावट स्पर्धेत काही कारणास्तव भाग न घेता आलेल्या कित्येक आखातीकरांना हि संकल्पना निश्चितच भावणारी आहे.

यंदा सर्व " आखाती करांसाठी " जाहीर आवाहन करत आहोत ज्याद्वारे त्यांनी आपल्या घरात साजऱ्या होणाऱ्या बाप्पाच्या उत्सवासंदर्भातील आपले नवे , जुने अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवावेत ज्यात काही पूर्वीच्या आठवणी असतील, मूर्ती निवडताणाचे काही अनुभव , मायदेशातून मूर्ती आणतानाच अनुभव , सजावट करताना होणारी अडचण , विसर्जन करतानाचे अनुभव किंवा आखातात राहत असताना साजरा होणारा उत्सव आणि मायदेशात साजरा होणारा उत्सव ह्यामध्ये नकळतपणे केली गेलेली तुलना अशा विविध प्रकारे तुम्ही आपले अनुभव आमच्यापर्यंत पाठवा. सोबत बाप्पाचे २ फोटो आणि तुमची माहिती.

मंडळी उत्सव काळादरम्यान आपले अनुभव संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्याचा आमचा मानस आहे.हि स्पर्धा नाही तरी देखील २ आगळ्या वेगळ्या अनुभवांना विशेष प्राधान्य देऊन त्या आखातीकराना सन्मानित करण्यात येईल. चला तर मग " आखाती बाप्पा २०१७ " च्या आगमनाच्या तयारीला लागूयात.

contact : contact@aakhatimarathi.com

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More