Skip to main content

About Us

About Us

"आखाती मराठी" वेब विश्वात अजून एका संकेत स्थळाची भर प्रतिक्रिया गृहीत धरूनच आम्ही या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. वेब विश्वात उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये आखाती देशांबद्दल जास्तीतजास्त माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा हा थोडा वेगळा प्रयत्न.

आखाती किवा मध्य पूर्वेकडील देश प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, ओमान , बहारीन आणि कतार ह्या देशांबद्दल फार पूर्वीपासून सगळ्यांनाच आकर्षण वाटत आहे. अल्पावधीत ह्या देशांनी केलेली प्रगती, तेथील राजेशाही, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे संघटन कौशल्य, नैसर्गिक संपत्तीचा असलेला अमोघ स्त्रोत आणि त्याचा केला जात असलेला उत्तम विनियोग हे तसे कायम स्वरूपी चर्चिले जाणारे विषय.

साधारणपणे आखाती देशांमध्ये नोकरी, धंद्यानिमित्त जाण्याचे प्रमाण हे ७० ते ८० च्या दशकापासून वाढलं. त्यातही प्रामुख्याने दक्षिणेकडील म्हणजेच केरळ प्रांतातील लोकांचे प्रमाण सर्वात जास्त. त्याचबरोबर फाळणीमुळे कित्येक सिंधी कुटुंबियांचे वास्तव्य तसे आधीपासूनच ह्या प्रांतात होते त्यामुळे कित्येक सिंधी कुटुंबे देखील ह्या प्रांतात स्थलांतरित होत होती. अशातच हातावर मोजता येईल अशी काही मराठी कुटुंबे देखील त्यावेळी मध्यपूर्व देशांमध्ये आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत होती.

त्याकाळात हे देश देखील संक्रमणावस्थेतुनच जात होते आणि नुकतेच तेलाचे खजिने त्यांच्या हाती लागले होते आणि त्याचा योग्य तो विनियोग करणे हे त्यांच्यासाठी देखील एक आव्हान होते. अशावेळी मनुष्य बळ तेही उच्चशिक्षित त्यांची गरज होती आणि खऱ्या अर्थाने त्याचकाळात मराठी भाषिकांनी आपले पहिले पाऊल ह्या भूमीवर टाकले आणि कालांतराने आपल्या अमर्याद सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी संपूर्ण आखातावर आपला ठसा उमटवण्यास सुरवात केली. आजमितीस संपूर्ण आखाताबद्दल नाही तरी अरब अमिरातीमधील मराठी भाषिकांबद्दल बोलायचे झाले तर सरकारी नोंदी प्रमाणे मराठी भाषिक हे एकूण भारतीय लोकसंख्येमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत.

अशाच सर्व स्थानिक " आखाती मराठी " भाषिकांसाठी त्याचबरोबर आखातात येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मराठी जनांसाठी मग त्यात पर्यटक असोत किवा नवीन नोकरी / व्यवसाय करण्याच्या निमित्ताने येणारे लोक असोत त्या सर्वाना ह्या प्रांताबद्दल , येथील एकूण व्यवस्थेबद्दल , काही महत्वाच्या सरकारी नियमांबद्दल ची विश्वसनीय आणि खात्री पूर्वक माहिती सहज रीतीने उपलब्ध करून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ह्या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

आखाती मराठी टीम

यु.ए.ई. - अबोली कर्णिक

ओमान - व्रिचिता कर्णिक

संपर्क :

e-mail : contact@aakhatimarathi.com 

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More