Skip to main content
 • View from Burj Khalifa
 • City Tour Bus Dubai
 • Desert Safari

Gold Rate(AED per gram)

 • 24CT 148.00
 • 22CT 139.00
 • 18CT 113.75

Silver Rate(AED per KG)

 • 2,165.00

Rates sponserd by

PNG LOGO
Chef-in-mom-contest

युनायटेड अरब एमीरात (UAE)

 • अधिकृत नाव

  दौलत अल अमारत अल अरेबिया अल मुताहिदाह
 • आंतरराष्ट्रीय नाव

  युनायटेड अरब एमीरात
 • ISO Country Code

  AE
 • Country Calling Code

  +971
 • राजधानीचे शहर

  अबू धाबी
 • इतर शहरे

  अल ऐन , रास अल खैमाह , दुबई, फुजैराह , अजमान , शारजा
 • स्वातंत्र्य दिन

  २ डिसेंबर १ ९ ७ १
 • तापमान

  उष्ण, दमट
 • नैसर्गिक स्त्रोत

  पेट्रोलियम , नैसर्गिक वायू
 • Currency

  UAE Dirham (AED)
  1(AED) = 18 RS

इतिहास

७ एमिराती किंवा ७ राज्य मिळून बनलेला देश हि युएइ ची मुख्य ओळख. हि ७ एमिरात म्हणजे अबू धाबी, दुबई,शारजाह, अजमान, उम-अल-क्वैन , रास अल- खैमा , फ़ुजैराह. बहुतांशी जमीन हि वाळवंट परंतु त्यातही प्रत्येक प्रांतातील वाळूमध्ये विविधता हि युएइ ची खासियत.

आकारमानाने अतिशय लहान परंतु मध्य-पूर्व देशांमधील सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून युएइ चा उल्लेख केला जातो. १९७१ मध्ये दिवंगत राष्ट्रपती शेख झायेद यांनी अविकसीत अशी आजुबाजुची राज्ये एकत्र करून युएइ ह्या राष्ट्राची बांधणी केली.

आज पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून युएइ चा उल्लेख केला जातो. तसेच जगातील काही अतिप्रगत अशा राष्ट्रांच्या पंगतीत देखील युएइ ला मानाचे स्थान आहे. तेलाचा लागलेला शोध हि युएच्या प्रगतीतील जरी प्रमुख बाब असली तरी त्याचा योग्य तो विनियोग करून स्वत:चे स्थान जगातील प्रमुख राष्ट्रांमध्ये आणण्यासाठी त्यांच्या राज्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हि खरच कौतुकास्पद आहे.

अबू धाबी

युनायटेड अरब एमिरात देशाची राजधानी आणि देशातील एकूण सात राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य. ७०० किमी चा समुद्रकिनारा आणि त्यात जवळपास २०० बेटांचा अंतर्भाव हे अबू धाबी चे वैशिष्ट्य.

अबू धाबीची खरी भरभराट सुरु झाली ती २० व्या शतकाच्या मध्यावर. १९५८ मध्ये अबू धाबी मध्ये तेलाचे साठे मिळाले आणि अबू धाबीचा चेहरा मोहरा पालटला. तोपर्यंत अबू धाबी आणि आजूबाजूची राज्ये हि इंग्रज राजवटीखाली होती. मात्र तेलाचा शोध लागला आणि ह्या प्रांतामध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली.

करारानुसार इंग्रज राजवट संपल्यावर १९७१ साली ७ राज्यांनी ( एमिरेट्स ) एका सक्षम देशाची ' युनायटेड अरब एमिरात' नावाने अबू धाबीचे राज्यकर्ते  शेख झाएद बिन सुलतान अल नहाय ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली.

सुरेख समुद्रकिनारा , तब्बल २०० बेटांचा अंतर्भाव , दूरवर पसरलेले वाळवंट ,कसदार मरुभूमीचे वरदान , अनेक उत्तम पर्यटन स्थळे आणि तेल आणि खनिज निर्यातीचे जगातील मध्यवर्ती ठिकाण ह्यामुळे अबू धाबी आज जगातील एक उत्कृष्ट विकसित शहर म्हणून नावारूपास आले आहे.

दुबई

देशाची आर्थिक राजधानी दुबई एक अत्यंत आधुनिक आणि प्रगत असे जगातील प्रमुख शहर म्हणून ख्यात आहे. प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हि दुबई ची खासियत त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रातील प्रगती हा देखील कौतुकाचा विषय. जगातील सर्वात उंच ईमारत "बुर्ज खलिफा" , एकमेव सप्ततारांकित "बुर्ज अल अरब" हे हॉटेल. वैशिष्ट्यपूर्ण असे मॉल त्यात "मॉल ऑफ एमिरत", "दुबई मॉल" हे काही प्रमुख मॉल हि दुबई ची शान.

दुबई एक विलक्षण आणि अद्भुत असे शहर. पर्यटकांच्या दृष्टीने नंदनवन. दुबईची सफर न केलेल्या लोकांच्या दृष्टीकोनातून दुबई म्हणजे एक concrete jungle पण हीच सफर घडून गेल्यावर मतपरिवर्तन करण्याची ताकद असलेले शह्रर. दुबई म्हणजे काळाच्या बरोबरीने धावणारे शहर म्हणून देखील त्याची एक ओळख आहे. ज्या गोष्टी कदाचित आपण स्वप्न म्हणून पाहतो त्याच गोष्टी दुबई मध्ये अगदी ह्याची देही ह्याची डोळा दिसतात.

प्रगतीचा अतिप्रचंड वेग हे दुबईचे खास वैशिष्ट्य. स्वत:च्या मर्यादा ओळखून आणि त्याचेच भांडवल करून जगाला आपल्याकडे आकर्षित करण्याची दुबईची हातोटी खरच विलक्षण.

Burj-al-Arab

जाहीर आकडेवारीनुसार जगातील जवळपास १०० पेक्षा अधिक देशातील नागरिक दुबईमध्ये नोकरी, उद्योग धंद्यानिमित्त वास्तव्य करून आहेत. हि संख्या स्थानिक लोकसंख्येच्या कितीतरी पटीने अधिक आहे. परंतु असे असतानाही दुबईने आपल्या अरबी संस्कृतीशी कुठेही फारकत घेतलेली नाहि. उलट आपली संस्कृती जास्तीतजास्त कशी जपली जाईल आणि तिचे संवर्धन कसे होईल ह्याकडे दुबईच्या राज्यकर्त्यांचा कटाक्ष असल्याचे आपल्या लक्षात येते.

केवळ आणि केवळ स्वप्नात बघितल्या जाणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणणे हा बहुदा दुबईच्या राज्यकर्त्यांचा छंद असावा. मान्य कि ह्यासाठी पुरेसा पैसा असणे हे गरजेचे आहे परंतु फक्त पैसा असून ह्या गोष्टी घडत नाही त्यासाठी लागते ती दुर्दम्य इच्छाशक्ती आणि तीक्ष्ण दुरदृष्टी.

दुबईचा इतिहास म्हणजे अवघा ४० वर्षांचा कालावधी. आपल्या भौगोलिक परीस्थितीचा आढावा घेऊन ८० च्या दशकात दुबई मध्ये जेबेल अली ह्या बंदराची निर्मिती करण्यात आली.

Palm Island

आज जगातील काही अतिउत्तम आणि सर्व सोयीनी युक्त अशा बंदरांमध्ये जेबेल अली चे नाव घेतले जाते.

स्वत:ची अति आलिशान अशी विमान कंपनी, त्यासाठी भव्य अशा विमानतळाची निर्मिती, मानवनिर्मित बेटाची निर्मिती ( पाम आयलंड), जगातील सर्वात उंच इमारतीची ( बुर्ज खलिफा ) निर्मिती, जगातील एकमेव अशा ७ स्टार हॉटेलची रचना ( बुर्ज अल अरब) , अतिप्रगत अशा मेट्रो ट्रेन ची वाहतूक ह्या सर्व गोष्टी दुबईच्या प्रगतीच्या गाथा आहेत.

सर्वात प्रसिद्ध असे ७ एमिरातीमधील शहर हि दुबईची ओळख. आखाती देश असूनही दुबईचे खनिज तेल (oil) आणि नैसर्गिक वायू (gas) च्या माध्यमातून होणारे उत्पन्न हे तसे फारच कमी आहे. ह्याचमुळे दुबईचा प्रमुख उत्पन्न स्त्रोत हा नेहमीच देशातील व्यापारावर अवलंबून राहिला आहे. मात्र सध्या प्रचंड वेगाने विकसित होत असलेला पर्यटन व्यवसाय हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनत चालला आहे.

खऱ्या अर्थाने दुबईच्या पर्यटन विकासाचा पाया रचला गेला तो १९९७ साली अस्तित्वात आलेल्या Dubai Department of Tourism and Commerce Marketing (DTCM) च्या निर्मितिनंतर. दुबईतील पर्यटनाशी संबंधित सर्व गोष्टींचे नियोजन, आयोजन DTCM ह्या स्वतंत्र सरकारी विभागाद्वारे केले जाते.

दुबईमध्ये फिरायला येण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. ह्या काळात वातावरण देखील खूपच आल्हाददायक असते. याच अनुशंघाने दुबई शॉपिंग फेस्टिवल चे देखील आयोजन करण्यात येते. शॉपिंग फेस्टिवल चा काळ म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच.

Dubai Shopping Festival

फेस्टिवल चे खास वैशिष्ट्य म्हणजे दुबईतील जवळपास प्रत्येक रस्त्यावर, झाडांवर करण्यात येणारी दिव्यांची रोषणाई. सर्व प्रमुख मॉल ह्या फेस्टिवल मध्ये सहभागी होतात आणि त्यांच्यामार्फत ग्राहकाना खरेदीसाठी उद्युक्त करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. ग्लोबल विलेज, हेरीटेज विलेज तसेच विविध प्रकारचे रोज संध्याकाळी भरवले जाणारे कार्निवल हे फेस्टिवल चे प्रमुख आकर्षण. दुबई ची खरी मजा घ्यायची तर ती फेस्टिवल च्या काळात ह्यात शंकाच नाहि. त्याचबरोबर ह्या काळात काही विशिष्ट theme असलेल्या गोष्टी देखील आयोजित केल्या जातात Miracle Garden हा त्यातलाच एक प्रकार.

प्रामुख्याने सांगायचे तर DSF ( दुबई शॉपिंग फेस्टिवल ) , DSS (दुबई समर सरप्राईज ) चे आयोजन तसेच पर्यटनाशी निगडीत सर्व बाबींचे नियोजन , पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनातून इतर Service Industry शी निगडीत गोष्टी म्हणजेच हॉटेल, हॉटेल अपार्ट मेंट त्यांचे त्यांच्या दर्जानुसार वर्गीकरण तसेच त्यांच्याकडील सोयी ,सुविधांबाबत काही कठोर नियम त्याबाबतची वरचेवर पाहणी, तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईतील ऐतिहासिक स्थळांचा विकास , त्यांचे संवर्धन वा जतन याबाबतचे निकष ह्या सर्व गोष्टी DTCM तर्फे अमलात आणल्या जातात.

Burj-Khalifa

एकंदरीत दुबईच्या अर्थ व्यवस्थेसंदर्भात विचार करता DTCM ची भूमिका फार मोलाची आहे ह्यात शंकाच नाही.

म्हणूनच स्वप्न बघणे आणि ते प्रत्यक्षात आणणे म्हणजे काय ह्याचा प्रत्यय घेण्यासाठी एकदातरी दुबई ची वारी करणे हे गरजेचे आहे.

शारजा

अरबी संस्कृतीचे संवर्धन, जुन्या परंपरांचे जतन करतानाच संपूर्ण कुटुंबासाठी उत्कृष्ट असे पर्यटन स्थळ म्हणून शारजाने स्वत:ची युएई मध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Important Numbers

Important Numbers

Important dialing instructions

Situation Dialing procedure Example
Calling from outside the UAE Dial international, 971, 02(AbuDhabi),04(Dubai),06(Sharjah) then the 7 digit telephone number. Ignore the 04 preceding the number 00 971 City Code XXXXXXX
Calling from the UAE but from another State, eg. Abu Dhabi or Sharjah.
Also when using a mobile phone.
Dial City Code then the 7 digit telephone number 02 OR 04 OR 06  XXXXXXX
Calling from a land line within City Dial City Code then the 7 digit telephone number City Code XXXXXXX
Calling from City  land line to a mobile phone Dial 050 then the 7 digit mobile number 050 XXXXXXX
Call from outside the UAE to a mobile phone Dial international, 971, 50, then the 7 digit mobile number. 00 971 50 XXXXXXX
 • Dubai Emergency numbers

    Number
  Ambulance and Police 999
  Fire 997
  Electricity and Water 991
  Emergency Services +97142232323
  Airport Enquiries +97142066666
  Dubai Municipality Emergency Number +97142232323
 •  

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More