Skip to main content

Oman

 • अधिकृत नाव

  सल्तनत उमान
 • आंतरराष्ट्रीय नाव

  सल्तनत ऑफ ओमान
 • ISO Country Code

  om
 • Country Calling Code

  +968
 • राजधानीचे शहर

  मस्कत
 • इतर शहरे

  धोफार, सलालाह, सोहर, सूर
 • स्वातंत्र्य दिन

  18 November
 • तापमान

  उष्ण , समुद्र किनाऱ्या जवळील भागात दमट, दक्षिणेकडील काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस
 • नैसर्गिक स्त्रोत

  खनिज तेल, तांबे, चुनखडी, नैसर्गिक वायू
 • Currency

  ओमानी रियाल (OMR)
  1 (OMR) = 169.55 RS

 इतिहास

ऐतिहासिक दृष्ट्या ओमानी लोक म्हणजे दर्यावर्दी आणि व्यापारी प्रामुख्याने भारतीय उपसागर, पूर्व आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमध्ये ज्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले.

१९७० मध्ये सुलतान कबूस ह्यांनी आपल्या वडीलांकडून राजगादीचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि आजही ते देशाचे सर्वेसर्वा म्हणून घोषित आहेत. त्यांच्या राजवटीखाली आणि त्यांच्या दूरगामी धोरणाखाली देशाचा त्यांनी विकास घडवून आणला. आज ओमान चे सर्व मध्य पूर्व देशांशी अतिशय सलोख्याचे संबंध असण्यामागे सुलतान काबूस ह्यांच्या धोरणाचा फार मोठा वाटा आहे.

मस्कत

प्राचीन संस्कृती आणि इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले आज ओमान देशाची राजधानी असलेले शहर म्हणजेच मस्कत.

पूर्वीपासून एक उत्कृष्ट असे जगातील काही मोठ्या बंदरांपैकी एक असणारे नैसर्गिक बंदर हि मस्कतची ओळख. कदाचित ह्याचमुळे मस्कत म्हणजे " जहाज नांगरण्याची जागा ( Place of Anchorage ) " अशीही मस्कत ची ओळख केली जाते.

मालवाहतूक बोटींमधल्या सामानाची देवाण- घेवाण करण्यासाठी प्रामुख्याने भारत, अरबी देश आणि युरोप देशांमध्ये दुवा साधणारे अत्यंत महत्वाचे असे हे बंदर.

हज्जर पर्वत रांगांनी विभागले गेलेले शहर आणि चहुबाजुने उंच उंच भिंती असणारे ज्या पोर्तुगीजांनी शहराच्या संरक्षणासाठी बांधल्या असा कयास आहे. आज जवळपास ८ लाख लोकवस्ती असलेले ओमान मधील अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षित शहर म्हणून प्रसिद्ध.

सोहार

ओमानच्या उत्तर किनारपट्टीवरील बंदर, सिंदबाद ह्या दर्यावर्दीचे घर म्हणून ओळखले जाणारे आणि एकेकाळी ओमान मधील सर्वात प्रगत शहर म्हणून ज्याचा नावलौकिक होता असे शहर जे आज अत्यंत महत्वाचे असे औद्योगिक शहर म्हणून ओळखण्यात येते ते म्हणजे सोहार किंवा सुहार.

फार पूर्वी हे शहर तिथे उपलब्ध असलेल्या तांब्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध होते. आजही आढळून येणाऱ्या काही पुरातन अवशेषांद्वारे त्याची ओळख पटते. आज देखील सोहार मध्ये तांब्याच्या ३ खाणी कार्यरत आहेत आणि वर्षाकाठी जवळपास १८ मिलियन टन इतकी तांब्याची आयात इथून जगभरात होते.

कित्येक शतके जुना असा सोहारचा समुद्रालगतचा किल्ला आणि त्यात असलेले संग्रहालय ओमानच्या प्राचीन संस्कृतीची साक्ष पटवून देतात. भोवतालच्या डोंगर दऱ्यांमध्ये आढळणारे नैसर्गिक झऱ्यांचे स्रोत हि देखील सोहारची विशेष ओळख.

सोहार मधिल प्रेक्षणीय ठिकाणे

 1. सोहार किल्ला
  शहराच्या मध्यवर्ती भागात पोर्तुगीजांनी १३ व्या शतकात बांधण्यात आलेला हा किल्ला सोहारची विशेष ओळख. पोर्तुगीजांच्या कालखंडाची साक्ष देणारे किल्ल्यातील खास असे संग्रहालय हे निश्चित प्रेक्षणीय.
 2. सोहार चे समुद्र किनारे
  बहुतांशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र् आणि त्याचमुळे सरकारकडून बीच ची व्यवस्थित निगा राखली जाते.
 3. मतराह सुक
  बऱ्यापैकी मोठा असा ओमानचा पारंपरिक बाजार. बहुतांशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या भेटवस्तू मिळणारे एकमेव ठिकाण.

इतर आखाती देश

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More