Skip to main content

आखाती देश

GCC Counties Flag

पर्शियन सागराच्या पश्चिम किनारपट्टीवरील ६ देश बहरीन कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती हे देश इतर आखाती देशांचा जरी भाग असले तरी हे देश GCC देश म्हणून देखील ओळखले जातात.

प्रामुख्याने भाषा , परंपरा आणि इतर रीतीरिवाज ह्याबाबतीत हे देश काही प्रमाणात अगदी सारखे आहेत. राज्य व्यवस्थेबद्दल सांगायचे तर काही देशांमध्ये अजूनही पारंपारिक राज्यव्यवस्था अस्तित्वात आहे.

जगातील तेल आणि नैसर्गिक वायू चे उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख देशांमध्ये GCC देशांचा अंतर्भाव होतो. साहजिकच आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्यामुळे आणि एकंदरीत स्थानिक लोकसंख्येचे असलेले अल्प प्रमाण त्याचमुळे ह्या देशामध्ये नोकरी - व्यवसाया निमित्त स्थलांतरित होण्याचे प्रमाण खूपच वाढले . काही प्रमाणात ह्याची सुरवात झाली ती भारतीयांकडून आणि काही प्रमाणात महाराष्ट्रीयन लोकांकडून जे साधारणपणे ७० - ८० च्या दशकात ह्या देशांमध्ये आले.

एकाअर्थी ह्या देशांच्या जडण घडणी मध्ये भारतीयांचा फार मोलाचा वाटा आहे ह्यात शंकाच नाहि.

Explore Gulf Countries

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More