आखाती देश

Kuwait

Kuwait Flag

देशाचे अधिकृत नाव - दौलत अल कुवायात

स्थानिक नाव - अल कुवायात

आंतरराष्ट्रीय नाव - कुवैत


ISO Country Code: kw

Country Calling Code: +965


राजधानीचे शहर - कुवैत

देशातील इतर प्रमुख शहरे - अहमदी, जाहरा , फाहाहिलं


स्वातंत्र्य - १९ जून १९६१


भौगोलिक रचना -

पर्शियन सागराच्या उत्तर-पश्चिम टोकावरील आखाती देश

आकार - ६ ८ ८ ० sq. mi.

हवामान - उष्ण आणि उन्हाळ्यात कोरडे.


लोकसंख्या - साधारण ३ ५ लाख

धर्म - मुस्लिम

अधिकृत भाषा - अरबी


नैसर्गिक - स्त्रोत

खनिज तेल, नैसर्गिक वायू,


अधिकृत चलन - कुवैती दिनार (KWD)


सीमा देश - इराक, सौदी अरब


कुवैतचा इतिहास

कुवैत प्राचीन ओटोमान किंवा तुर्की राजेशाहीचा एक भाग म्हणून इतिहासात प्रसिध्द . १९ व्या शतकाच्या सुरवातीस शेख मुबारक ह्याने ब्रिटीशांबरोबर केलेल्या करारनाम्यानुसार कुवैत हे राष्ट्र ब्रिटीश राजवटीखालील राष्ट्र म्हणून उदयास आले.१९ व्या शतकाच्या मध्यावर कुवैत ने आपल्या पेट्रोलियम व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यास सुरवात केली.

१९ जून १९६१ रोजी कुवैतला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि १९६३ साली कुवैतला अधिकृतरीत्या UN चे सभासदत्व प्राप्त झाले

२ ऑगस्ट १९९० साली इराकच्या अतिक्रमणामुळे कुवैत च्या सार्वभौमत्वाला धक्का लागला. आखाती युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्द्ध झालेल्या ह्या युद्धात कुवैत चे प्रचंड नुकसान झाले. अमेरीकेच्या हस्तक्षेपामुळे २३ फेब्रुवारी १९९१ रोजी इराकचा पाडाव होऊन कुवैत पुन्हा एकदा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले.