Skip to main content
Maharashtra Desha

प्रस्तावना

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा , कणखर देशा, दगडांच्या देशा , नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ,
भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासी , वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या इकची देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

महाराष्ट्राचे इतके सुंदर वर्णन अजून काही असूच शकत नाही. आपल्या अमर्याद शब्द सामर्थ्याच्या जोरावर कवी गोविंदाग्रज ( राम गणेश गडकरी ) ह्यांनी समग्र महाराष्ट्राचे त्यातील विविध रंगांचे, प्रतिभेचे , कलागुणांचे केलेले वर्णन केवळ विलोभनीय.

महाराष्ट्र खऱ्याखुऱ्या अर्थाने विविध रंगांनी नटलेले राज्य. कुठे निसर्गाची मुक्त उधळण, कुठे कलेची पखरण तर कुठे शिक्षणाचे कोंदण !

अठरापगड जाती जमातींच्या वास्तव्याने बहरलेल्या ह्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताची स्वत:ची अशी खास ओळख. त्यात भाषेची खुमारी असो , वेशभूषेतील विविधता असो किंवा खाद्यपदार्थांची खासियत असो.

तर अशा ह्या आपल्या कणखर राज्याची ओळख सर्व आखाती करांसाठी करून द्यावी हा उद्देश डोळ्यासमोरून ठेऊन आम्ही " महाराष्ट्र देशा" ह्या सदराची सुरवात करत आहोत. सदराचा प्रमुख उद्देश राज्यातील नवीन नवीन पर्यंटन स्थळे काही पारंपारिक देवस्थाने, महाराष्ट्राचे वैभव असलेले गड, किल्ले आणि महाराष्ट्रातील वन्यजीवन संवर्धन करणारी अभयारण्ये ह्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी हा आहे.

तशी हि माहिती प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाकडे असतेच. परंतु परदेशात वास्तव्य करत असताना जेव्हा वर्षभरातून काही दिवसांसाठी आपल्या मायदेशी सुट्टी वर गेल्यावर जर अशाप्रकरची माहिती सहजरीत्या उपलब्ध असेल तर ती निश्चितच उपयोगाची ठरेल.

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More